हॉटेल शिवनेरी गार्डन आणि रेस्टॉरंट ,महू डॅम ठरणार जावळीतील पहिल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन असणार हॉटेल.

 सातारा जिल्ह्यातील जावळीतील सुप्रसिद्ध हॉटेल शिवनेरी गार्डन आणि रेस्टॉरंट ,महू डॅम लवकरच ठरणार पहिल चार्जिंग स्टेशन असणार हॉटेल.

हॉटेल शिवनेरी गार्डन आणि रेस्टॉरंट हे हॉटेल, महू धरणाच्या आकर्षणाचा एक महत्वाच केंद्र बनले आहे निसर्गरम्य स्थानासाठी तसेच तेथील चवीसाठी पर्यटकांच आवडते ठिकाण बनले आहे ,महू धरणावर येणाऱ्या पर्यटकांना इथली चव चाखण्याचा मोह आवरता येतच नाही,इथल निसर्ग सौदर्य,चव,स्वच्छता आणि मनाला प्रसन्न करणारे महू धरणाचे दृश्य या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

काही पर्यटकांना त्यांचे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यासाठी सोय उपलब्ध नसल्याने गैरसोय होत होती या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून हॉटेल शिवनेरीचे मालक मा.सुशील विष्णुपंत गोळे यांनी चार्जिंग इंडिया या नामांकित कंपनी सोबत करार केला असून लवकरच येथे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन स्थापन करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे त्यामुळे  इलेक्ट्रिक वाहन  असणाऱ्या पर्यटकांची गैरसोय थांबणार आहे.महत्वाचे म्हणजे हॉटेल शिवनेरी हे जावळी भागातील पहिल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन असणारे हॉटेल बननार आहे.यामुळे जास्तीत जास्त पर्यटकांना महू धरणाचा मन मुराद आनंद हॉटेल शिवनेरी मार्फत घेण्याची संधीच उपलब्ध होत आहे.

या उपक्रमामुळे प्रदूषण कमी होईल असे होटेल मालक मा.सुशील विष्णुपंत गोळे यांचा दावा आहे तसेच भविष्यात स्वतः हॉटेल शिवनेरी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहन उपलब्ध करणार असल्याचे गोळे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोरोना नंतर सौर ऊर्जा व्यवसायातील संधी ,भाग१